Ladki Bahin Yojana Beneficiary Verification: लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. आता लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. याबाबत माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे..महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. .Ladki Bahin Yojana: ई-केवायसी असूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता का मिळाला नाही? जाणून घ्या नेमकी चूक काय ?.तथापि, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री तटकरे यांनी म्हटले आहे. .Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त; भंडाऱ्यात मुंबई–कोलकाता महामार्ग रोखला.लाडक्या बहिणी आक्रमकदरम्यान, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अद्याप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी लाभार्थी महिलांकडून येत आहेत. यावरुन विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेतील गोंधळामुळे, राज्यातील सुमारे ६० टक्के पात्र महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ चा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याचे म्हटले आहे. ''विदर्भात भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहेत. पण महायुती सरकार कानाला झापडे बांधून बसले आहे. महायुती सरकारने ही योजना बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू नये. तातडीने महिला लाभार्थींना त्यांचा हप्ता खात्यात जमा करावा. व्होट बँकेचं राजकारण संपलं की बहिणींची मायाही आटली का?'', असा सवाल ठाकूर यांनी केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.