Maharashtra Government Women Welfare Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ३३९.१४ कोटी इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे..गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्ताची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट २०२६ महिन्याचा आर्थिक लाभ, अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी ३३९.१४ कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही निधी महिला व बाल विकास विभागाला वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. .Ladki Bahin Yojana e-KYC: १.६५ कोटी लाडक्या बहिणींची चिंता मिटली, मुख्यमंत्र्यांची माहिती, 'ई-केवायसी'बाबत मोठा खुलासा.सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे..Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’चा आकडा पडताळणी केलेला : मुख्यमंत्री फडणवीस.सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहील. तसेच या विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थीसाठी होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. .लाडकी बहीण योजनेतून सुमारे ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे आता केवळ १ कोटी ६५ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. कुटुंबाचे उत्पन्न, सरकारी नोकरी, दोन योजनांचा लाभ आणि इतर निकषांत न बसल्यामुळे लाखो महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. सुरुवातीला या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या २ कोटी ४८ लाख होती. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.