Ladki Bahin Yojana Payment Update: सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ५६३ महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुरवातीला लाभ मिळाला. आता निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांनाच दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. लाभार्थींच्या ‘ई-केवायसी’मुळे फेब्रुवारीनंतर एकाही लाभार्थीस योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता ‘ई-केवायसी’नुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच तीन महिन्यांचे एकदम ४,५०० रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली..मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सुरवातीचे पाच-सहा महिने दरमहा लाभ देण्यात आला. पण, जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून प्रत्येक लाभार्थी महिलेची निकषांनुसार पडताळणी सुरू झाली. सुरवातीला सरकारी नोकरदार महिला लाभार्थी वगळले. त्यानंतर महिला व पुरुष एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांची पडताळणी झाली, महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळले. केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणारे, चारचाकी असलेल्या महिला वगळल्या. .Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'च्या नावाखाली फसवणूक, आदिती तटकरेंनी घेतली गंभीर दखल, दिला महत्त्वाचा सल्ला.आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी ई-केवायसी करण्यात आली. पण, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांनी मुदतीत ‘ई-केवायसी’च केली नाही. त्यामुळे पात्र असतानाही त्यांना लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एका संधीची मागणी देखील केली आहे..Ladki Bahin Yojana: निकषांत अपात्र लाडक्या बहिणींचा थांबणार लाभ.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थींची ई-केवायसी चुकली होती, त्याच्या दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. आता ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी राहिली आहे, त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशा मागणीचे अर्ज केले आहेत. त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळविली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतूनही अशीच मागणी झालेली आहे.- अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.