Pune News: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. नोव्हेंबर संपायला अवघे काही दिवस उरले असतानाही सरकारकडून याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. २-३ डिसेंबरला होणाऱ्या नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांपूर्वी हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. .नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात …नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्यापूर्वीच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका २ आणि ३ डिसेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकांपूर्वी सरकार महिलांच्या खात्यात पैसे जमा करू शकते. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही लेखी किंवा अधिकृत आदेश जारी झालेले नाहीत. परंतु, सूत्रांच्या मते नोव्हेंबरचा हप्ता थोडा उशिरा म्हणजे डिसेंबर महिन्यातच जमा होऊ शकतो. निवडणूक आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे थोडा उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही..Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार; हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी अनधिकृतरीत्या पैसे घेतल्याचे उघड.केवायसी अनिवार्य, अन्यथा लाभ बंद होणारयोजनेचा लाभ सतत मिळण्यासाठी आता सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत केवायसी पूर्ण न केल्यास पुढील हप्ते थांबवले जातील किंवा लाभार्थी यादीतून नाव काढले जाईल. ही ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यात महिलेची वैयक्तिक माहिती, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, बँक खाते तपशील आणि आधार कार्डची पडताळणी केली जाणार आहे..Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसीठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा १,५०० रुपयांचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात.या प्रक्रियेत असे आढळल्यास की एखाद्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहेत किंवा कुटुंबाचे उत्पन्न निकषापेक्षा जास्त आहे, तर त्या महिलांचे अर्ज बाद केले जातील. त्यामुळे ज्या महिला खरोखरच गरजू आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा या केवायसीमागचा मुख्य उद्देश आहे..म्हणून ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी किंवा महा-ई-सेवा केंद्राच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.