Pune News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची लाभार्थी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. जानेवारी संपत आला तरीही अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही निवडणुकीच्या आधी हप्ता देण्यात आल्याचा अनुभव आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही..निवडणुकीआधी हप्ता मिळण्याची शक्यता…राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीआधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. यापूर्वीही महापालिका निवडणुकांपूर्वी डिसेंबरचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही निवडणुकीआधी पैसे मिळण्याची शक्यता महिलांकडून व्यक्त केली जात आहे..Ladki Bahin Yojana: अंगणवाडी सेविका घरी येणार; पात्र महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता मिळणार ?.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याचा अंदाज…जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल ७ फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, साधारण १० दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० जमा होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण लाभार्थ्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी.ई-केवायसीतील त्रुटींवर सरकारचा उपाय…दरम्यान, काही महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ अलीकडे बंद करण्यात आला आहे. ई-केवायसी करताना प्रश्न नीट न समजल्याने काही महिलांनी चुकीची माहिती भरली होती. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे..आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. पात्र महिलांना आपली चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.