Climate Change Impact On Uttarakhand Agriculture: हिवाळी पाऊस आणि हिमवृष्टीअभावी उत्तराखंडमधील शेती आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः राज्यातील उंच भागांतील सफरचंद लागवडीला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जर हवामानात लवकरच सुधारणा झाली नाही, तर सफरचंद उत्पादनात मोठी घट होऊ शकते, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. .येथील धनौल्टी हा सफरचंद पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील फलोत्पादन अधिकाऱ्यांच्या मते, सफरचंद झाडांना त्यांची सुप्तावस्था पूर्ण करण्यासाठी तापमान शुन्य ते ७ अंश सेल्सिअस दरम्यान १ हजार ते १,५०० तास राहणे गरजेचे आहे..हिमवृष्टी झाली नसल्यामुळे पृष्ठभागावरील तापमान नेहमीपेक्षा अधिक राहिले आहे. ज्यामुळे झाडांचे नैसर्गिक चक्र विस्कळीत झाले आहे. यामुळे फुलधारणा आणि फळधारणा कमी होणे, सफरचंदांचा आकार लहान राहणे आणि रंग फिका पडणे असे परिणाम दिसून येऊ शकतात. ज्यामुळे बाजारातील त्याचे मूल्य कमी होते, असे अधिकारी सांगतात..Agricultural Advice: जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करा.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. या महिन्यात केवळ एकदाच सामान्य अथवा सामान्यपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ दरम्यानच्या कालावधीत ५.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१५-१६ मधील याच कालावधीत ८.५ मिमी, डिसेंबर २०१८ मध्ये २ मिमीहून कमी पाऊस पडला. डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान ४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर १ नोव्हेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ दरम्यान पाऊसच पडला नाही. यामुळे प्राथमिक अंदाजानुसार, पावसाअभावी हंगामातील सुमारे १५ टक्के पिकावर परिणाम दिसून आला आहे..Agriculture Advice: शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठांचा अधिक वापर करावा.डेहराडूनच्या हवामान केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही परिस्थिती हिमालयात हिवाळी पाऊस आणि हिमवृष्टी आणणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी राहिल्यामुळे निर्माण झाली आहे. .सफरचंदाचे प्रमुख पीक क्षेत्र असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्याच्या हरसिल पट्ट्यातील शेतकऱ्यांनी या वाढत्या प्रतिकूल हवामान बदलांबद्दलल चिंता व्यक्त केली आहे. जर हवामानात लवकरच सुधारणा झाली नाही, तर सफरचंद उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. .गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गाव प्रभावित झाले होते. हे नुकसान भरून सफरचंद उत्पादनातून भरून निघेल, अशी आशा येथील शेतकरी लावून बसले होते. पण नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारी महिन्यातही पाऊस अथवा हिमवृष्टी झाली झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. जर लवकरच हिमवृष्टी झाली नाही, तर सफरचंदाच्या फुलधारणेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. परिणामी उत्पादनात मोठी घट होईल, अशी चिंता धराली गावच्या सरपंचांनी व्यक्त केली आहे. .मसूर, गहू, मोहरी पिकांचे मोठे नुकसानहिमवृष्टीअभावी एप्रिल महिन्यात बुरशीजन्य संसर्ग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे सफरचंद उत्पादकांचे म्हणणे आहे. यामुळे चमोली जिल्ह्यातील शेती आणि फळबागांवर परिणाम झाला आहे. मसूर, गहू आणि मोहरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओलावा नसल्यामुळे सफरचंद लागवडीवरही ताण जाणवत असल्याचे चमोलीचे मुख्य कृषी अधिकारी सांगतात. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.