Manchar News: आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी हंगामात केली जाते. सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेतकरी अर्ध्या एकरापासून पाच एकरपर्यंत लागवड करत आहेत. थंडी वाढल्याने मजूर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना फार धावपळ करावी लागते. कांदा लागवडीतून महिलांना सरासरी प्रतिदिवस एक हजार ते एक हजार १०० रुपयापर्यंत रोजगार मिळत आहे..मंचर, अवसरी खुर्द, आदर्शगाव गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, कळंब, नांदूर, नारोडी, चास, घोडेगाव, लांडेवाडी, रांजणी, लाखानगाव, देवगाव, चांडोली खुर्द, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग आदी घोड, मीना नदीच्या काठावरील गावे, उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी मिळत असलेल्या एकूण ४५ गावात कांदा लागवड सुरु आहे..Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर.एक एकर कांदा उत्पादनासाठी खर्चरोपांचा कालावधी २ महिने : मजुरी देखभाल २ हजार रुपयेरोपे लागवड : ११ हजार रुपयेऔषधे, खते, काढणी, साठवणूक, बाजारपेठेपर्यंत वाहतूकखर्च : ६० हजार १७५ रुपयेलागवडीसाठी एकूण खर्च : ८१ हजार ५०० रुपये.आंबेगाव तालुक्यात दहा हजार एकर क्षेत्रात रब्बी हंगामात शेतकरी कांदा उत्पादन घेतात. कांद्याचे संगोपन व्यवस्थित होण्यासाठी व विविध कीड रोगापासून कांदा पिकाला संरक्षण मिळण्यासाठी कृषी सहाय्यक शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात.राज्य शासनाच्या कृषी विभागाने महाविस्तार एआय अॅप विकसित केले आहे.सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव तालुका.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.