Palghar News: निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता आता मजूरटंचाईमुळे वाढली आहे. तालुक्यातील मलवाडा, आलोंडे, साखरा, पाचमाड, तलवाडा यांसारख्या विविध परिसरांत भातझोडणीची कामे आता अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आली आहेत. .दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाची मोठी नासाडी झाली होती, परिणामी शेतीची कामे वेळेवर होऊ शकली नाहीत. आता पावसाने उघडीप दिल्याने, उरलेले पीक वाचवण्यासाठी रखडलेली कामे एकाचवेळी हाती घ्यावी लागली आहेत. यामुळे तालुक्यात मजुरांची चणचण भासत आहे. भातकापणीसाठी वाढीव मजुरी देऊन कशीबशी कापणी पूर्ण केल्यानंतर, आता झोडणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे..Paddy Procurement: पाच हजार भात खरेदी केंद्रे, दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ तासांच्या आत पैसे जमा, योगी सरकारचा निर्णय.बळीराजाचे अपार कष्टखेडोपाडी शेतकरी थंडीत पहाटेच शेतात खळा तयार करून झोडणीच्या कामाला सुरुवात करत आहेत. दोनशे ते पाचशे भाताच्या भाऱ्यांची गोलाकार उडवी रचून सकाळी १० पर्यंत ते झोडण्याचा प्रयत्न करतात. .Kharif Season Rice Production: खरिपात विक्रमी भात उत्पादनाचा अंदाज; कडधान्ये, तेलबिया उत्पादनात घट.मनुष्यबळ कमी असल्यास दुपारच्या जेवणानंतर पुन्हा काम सुरू होते. उन्हात झोडणी केल्यास पेंढ्यामुळे अंगाला खाज सुटण्याचा धोका असल्याने सकाळी, संध्याकाळी कामे उरकली जातात. शेतकरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांची नासधूस, मजुरीतील वाढ, मजुरांची कमतरता आणि खता-बियाणांची दरवाढ सहन करतात..सद्यस्थितीत विक्रमगड तालुक्यात भातझोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागात भातझोडणी झाली आहे. मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, भातबियाणे, खते, औषधे याचे वाढते भाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्या मानाने भाताला अत्यल्प हमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.- कमलाकर भोईर, शेतकरी, मलवाडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.