Palghar News : ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातील आठ गावे सुंदर गाव पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहेत. .यामध्ये पालघर तालुक्यातील तारापूरजवळील कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणून ठरले असून, या ग्रामपंचायतीने ५० लाखांचे राज्य सरकारचे बक्षीस पटकावले आहे. कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ४० लाख आणि तालुकास्तरीय १० लाख असे मिळून एकूण ५० लाखांचे बक्षीस देण्यात आले..Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा.हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. ४) पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक होते. .या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती..Rural Development: गावाने पुढाकार घेऊन केले पाणंद रस्ते.पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून ग्रामविकासासाठी प्रोत्साहन दिले. तसेच या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतींमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास व लोकसहभाग या उपक्रमांना नवी गती मिळणार आहे. तसेच निवड झालेली गावे इतरांसाठी आदर्श गावांचे प्रेरणा ठरतील, असा विश्वास पालकमंत्री नाईक यांनी व्यक्त केला..तालुकास्तरीय निवडलेली गावे (१० लाख प्रत्येकी)पालघर कुरगावतलासरी आमगाव-आच्छाडवाडा हमरापूरविक्रमगड वसुरीमोखाडा खोडाळावसई खानिवडेजव्हार झापडहाणू घोलवड .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.