Ahmednagar News: रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांकडून होणारी पाण्याची मागणी लक्षात घेता, कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, जलसंपदा विभागाने पुढील ४० दिवसांचे नियोजन निश्चित केले आहे..नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकली नव्हती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. .Kukadi Project: हिरडगावात कुकडी चारी दुरुस्तीला शेतकऱ्यांचा विरोध.या निर्णयामुळे पुणे (आंबेगाव, शिरूर, जुन्नर), सोलापूर (करमाळा) व अहिल्यानगर (कर्जत, श्रीगोंदा, पारनेर) या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रब्बी पिकांना या पाण्याचा वेळेत व पुरेसा लाभ व्हावा, यासाठी ४० दिवसांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. .Kukadi Project : ‘कुकडी’तील साठ्यामुळे मिटणार सिंचनाची चिंता.सद्यस्थितीत प्रकल्पात २६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी समन्यायी पद्धतीने करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. .पाण्याचा कोणताही अपव्यय न होता, कालव्याच्या शेवटच्या टोकावरील (टेल) गावालाही पाणी मिळावे, अशा सूचनाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.