Monsoon Impact: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाण्याची आवक थांबली आहे. गुरुवारी (ता. १६) सायंकाळपर्यंत प्रकल्पातील पाच धरणांमध्ये एकूण १२.५३ टीएमसी (४२.२५ टक्के) उपयुक्त साठा जमा झाला आहे..गतवर्षी १६ जुलैपर्यंत प्रकल्पात १५.५० टीएमसी (५२.२५ टक्के) पाणीसाठा होता. या वर्षीचा साठा गतवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढविण्यासाठी पुन्हा एकदा दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे मत कुकडी पाटबंधारे विभागाने व्यक्त केले आहे..Nashik Weather Update: नाशिक जिल्ह्यात पावसाची ओढ कायम.मागील आठवड्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे आणि डिंभे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात चार दिवसांत तब्बल १० टीएमसीने वाढ झाली होती. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक जवळपास थांबली असून, गेल्या २४ तासांत केवळ २२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा पावसाकडे लागले आहे..Dam Water Storage Update: नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३०.८६ टक्के पाणीसाठा.पेरण्या खोळंबल्याजुन्नर तालुक्यात खरीप पिकाखाली ५८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सुमारे ८ हजार ७१८ हेक्टर (तीस टक्के) क्षेत्रात पिकांची पेरणी झाली आहे. आठ जुलै पूर्वी पेरणी झालेल्या खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. .त्यानंतर मागील चार-पाच दिवसांत पेरणीची लगबग सुरू झाली. मात्र सद्यःस्थितीत जमिनीतील ओल कमी झाल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रात बीजांकुरण होण्यासाठी पावसाची गरज आहे. सद्यःस्थितीत पुरेशा ओलीअभावी तालुक्याच्या पूर्व भागात पेरणीची कामे थांबली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.