Farmers Safety : नागपूर शेतकऱ्यांना बोगस रासायनिक खताची विक्री केल्याप्रकरणी कुही तालुका कृषी विभागाने कारवाई करून ३०२ पोती खत जप्त केले. या प्रकरणी कृषी सेवा केंद्रातील व्यक्तींसह संबंधित खत उत्पादक कंपनीविरोधात कुही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पंचायत समिती, कुहीचे कृषी अधिकारी जगदीश कच्छीराव बेन्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मे. काकडे कृषी सेवा केंद्राची अचानक तपासणी करण्यात आली. या वेळी बारामती येथील गोरुरा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीचे डीएपी आणि १०:२६:२६ ग्रेडचे खत आढळून आले..Illegal Fertilizer Distribution: ‘कृषिमित्र’ भरती परीक्षेत अनधिकृत खतवाटप.कंपनीकडून डीएपीची २०० पोती आणि १०:२६:२६ ग्रेडची २०० पोती, अशी एकूण ४०० पोत्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी विक्रीसाठी ठेवलेली डीएपीची १७० आणि १०:२६:२६ ग्रेडची १३२, अशी एकूण ३०२ पोती जप्त करण्यात आली. या खताची यंत्रावरील नोंदही आढळून आली नाही..Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा.तपासणीदरम्यान शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची मागणी केली असताना त्यांना रासायनिक खत देण्यात आल्याचेही कृषी विभागाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी खत नियंत्रण आदेश, १९८५, आवश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत मनोज शिवाजी कोरटकर, अमोल गोविंदराव राठोड आणि विक्की वसंत काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर खताची गुणवत्ता आणि त्यातील घटकांबाबत अधिक स्पष्टता होणार आहे..विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, कृषी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) चंद्रशेखर कोल्हे आणि विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..‘शेतकऱ्यांनी बिल घेऊनच खत खरेदी करावे. बोगस खत विक्री करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाकडून कडक कारवाई केली जाईल.- जगदीश बेन्डे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, कुही\.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.