Agricultural Input Fraud Case: खासगी संस्थेमार्फत आयोजित ‘कृषिमित्र’ भरती परीक्षेदरम्यान अनधिकृत कृषी निविष्ठांचे वाटप केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी दोन जणांसह अन्य अज्ञातांविरुद्ध शुक्रवारी (ता. १७) गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान संबंधित खत उत्पादक कंपनी अस्तित्वातच नसल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे..कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी शिवाजीनगर येथील कै. सौ. कलावती चव्हाण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘महात्मा फुले कृषी विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर’ या खासगी संस्थेमार्फत ‘कृषिमित्र’ भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान अनधिकृत कृषी निविष्ठांचे वाटप होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती..Fake Fertilizer: ‘कृषी गौरव फर्टिलायझर’चे खत बनावट असल्याचे स्पष्ट.त्यानुसार खत निरीक्षक तथा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनकर जाधव आणि तालुका कृषी अधिकारी गोविंद पौळ यांच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रावर छापा टाकला..तपासणीत परीक्षार्थींना ‘क्रॉप बूस्टर (पोटॅशिअम ह्युमेट ६५ टक्के)’ या नावाची बायोस्टिम्युलंट खताची २५० ग्रॅम वजनाची ६० पाकिटे मोफत वितरित करण्यात आल्याचे आढळले. तसेच घटनास्थळी या उत्पादनाची आणखी १०९ सीलबंद पाकिटे जप्त करण्यात आली. या उत्पादनाचे नमुने ‘खत नियंत्रण आदेश, १९८५’ अंतर्गत शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले..Fake Krushimitra Recruitment: बोगस कृषिमित्र भरतीप्रकरणी कारवाई अहवाल मागविले; कृषी आयुक्तालयाचे निर्देश.या वेळी उपस्थित असलेल्या, तसेच ‘हिंदुस्तान एजी-टेक बायोटेक प्रा. लि., आनवा (ता. भोकरदन, जि. जालना)’ या कंपनीचे भागीदार असल्याचा दावा करणाऱ्या दत्ता पांडुरंग जाधव यांनी आवश्यक परवाने सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र आजपर्यंत संबंधित उत्पादनासाठी कोणताही वैध परवाना सादर करण्यात आलेला नसल्याचे कृषी विभागाने फिर्यादीत नमूद केले आहे..याप्रकरणी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी दिनकर जाधव यांच्या फिर्यादीवरून दत्ता पांडुरंग जाधव, गजानन पांडुरंग जाधव आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कृषी विभागाने सांगितले, की ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यापूर्वी जळगाव, धुळे, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यांतही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत..उत्पादनस्थळच अस्तित्वात नाहीछाप्यानंतर संबंधित उत्पादनाच्या वैधानिक परवान्यांबाबत शंका निर्माण झाल्याने भोकरदन तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत आनवा येथील नमूद उत्पादनस्थळाची पडताळणी करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी संबंधित कंपनी, खत उत्पादन यंत्रणा किंवा उत्पादनासाठी लागणारी कोणतीही सामग्री आढळून आली नाही. याबाबतचा पंचनामा करून कृषी अधिकारी अंकुश मस्के यांनी १३ जुलै २०२६ रोजी अहवाल सादर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.