Class-I status Village Demand: औद्योगिकऔद्योगिक वसाहती, साखर कारखाने आणि गावागावांतून नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण गंभीर बनले आहे. त्यामुळे सध्या ‘प्राधान्य वर्ग-चार’मध्ये असलेल्या कृष्णा नदीचा ‘प्राधान्य वर्ग-एक’मध्ये समावेश करून शासनस्तरावर तातडीने प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कृष्णाकाठच्या गावांमधून जोर धरू लागली आहे..गेल्या काही वर्षांत कृष्णा नदीतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायती तसेच औद्योगिक प्रकल्पांमधील रासायनिक व सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध सेवाभावी संस्था नदी स्वच्छतेसाठी जनजागृती करत असल्या, तरी केवळ प्रबोधन पुरेसे नसून शासनाने ठोस नियोजनासह आर्थिक तरतूद करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे..Krishna River Pollution: कृष्णाकाठच्या गावांतून नदी प्रदूषण, महापुराबाबत संवाद यात्रा सुरू.प्रदूषणामुळे नदीतील मासेमृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. शेती आणि जनावरांसाठीही हे पाणी अपायकारक ठरत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे..Krishna River: रसायनयुक्त पाण्यामुळे कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी.महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणांतर्गत शासनाने नदी प्रदूषणमुक्तीसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच सीएसआर निधी आणि गौण खनिज महसुलातील दहा टक्के निधीही या कामासाठी वापरण्याचे नियोजन आहे. या निधीतून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे..सध्या कृष्णा नदीचा समावेश ‘प्राधान्य वर्ग-चार’मध्ये असला, तरी प्रत्यक्ष स्थिती पाहता नदी तीव्र प्रदूषणाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. कृष्णा नदीचे संरक्षण करण्यासाठी तिला ‘प्राधान्य वर्ग-एक’ दर्जा देऊन दीर्घकालीन प्रदूषणमुक्ती आराखडा राबविण्याची मागणी वाढत आहे..“शासनाने कृष्णा नदीचा ‘प्राधान्य वर्ग-चार’मधून ‘प्राधान्य वर्ग-एक’मध्ये समावेश करून प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.