Dharashiv News : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाला आहे. ‘ट्रक्टेबल’ या जगप्रसिद्ध संस्थेने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचा अहवाल जलसंपदा विभागला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. .दुष्काळ निर्मूलन आणि पूरनियंत्रण या दोन्ही बाबी समोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून प्रकल्पातून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोऱ्यातून समुद्रात वाहून जाणारे पन्नास टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली..Marathwada Irrigation Project : ‘कृष्णा-मराठवाडा’ची डिसेंबरमध्ये चाचणी.पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून वाहून जाणारे पुराचे पन्नास टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी उपलब्ध होणार आहे. जागतिक बँकेच्या तांत्रिक सल्लागार असलेल्या संस्थेला प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. .आता तो अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेस आता गती मिळणार आहे. सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. कृष्णा खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी टेंभू धरणापासून ९३ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. .२०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगली भागात आलेल्या पुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुराचे पाणी समुद्रात वाहून न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागाच्या सिंचनासाठी केला जाणार आहे. त्यासाठीच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एकूण १२६ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात ९३ किलोमीटर लांबीचा आणि १४ मीटर रुंदीचा बोगदा आणि ३३ किलोमीटर लांबीचा कालवा (कॅनॉल) असणार आहे. .Krishna Marathwada Irrigation Project : कृष्णेच्या पाणी वितरणाची कामे हाती घ्या.आशिया खंडातील हा सर्वांत मोठा बोगदा ठरणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी ‘मित्र’ संस्थेच्या अधीनस्थ असलेल्या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाकडे देण्यात आली आहे. पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या प्रकल्पाच्या बैठकीत प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल जागतिक बँकेच्या तांत्रिक सल्लागाराकडून तीन महिन्यांच्या आत सादर करण्याचा निर्णय झाला होता..हक्कापेक्षा अधिक पाणी अन् तिहेरी लाभकृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी सात टीएमसी पाण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित १६.६६ टीएमसीपेक्षा अधिकचे पाणी या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात येणार आहे..यासोबत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूरस्थिती नियंत्रित करता येणार असून पुरामुळे होणारे शेतजमिनीचे, पिकांचे व जीविताचे नुकसानही टाळण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पन्नास टीएमसी पाणी उपलब्ध होऊन हक्कापेक्षा अधिक पाणी मिळणार असल्याने प्रकल्पातून तिहेरी लाभ होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.