Sangli News : गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला असला, तरीही यंदा कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणेसह सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. मे मध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा लाभ झाल्याचे चित्र आहे. कोयनेतून ऑक्टोबरमध्ये दोनदा विसर्ग करण्यात आला. .सांगली जिल्ह्यात या वर्षी रब्बी हंगामासह उन्हाळी सिंचन आवर्तनासाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने त्यावरील अवलंबित दुष्काळी तालुक्यांसाठीही ही आनंदाची बाब असेल. कृष्णा खोऱ्यात यंदा मेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली, अगदी नोव्हेंबर आला, तरी पाऊस कायम आहे. सिंचन योजना फार ताकदीने चालवाव्या लागल्या नाहीत. घरणातील पाणीसाठा आधीच शिल्लक होता. .Water Storage: खानदेशात विविध सिंचन प्रकल्पांतून विसर्ग घटला.मध्यंतरी सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने पुन्हा जोर केला आणि पूरस्थिती निर्माण झालो. धरणांत अधिक पाणीसाठा झाला होता. पाऊस थांबला आणि महापुराचे संकट टळले. त्यानंतर कोयना, वारणासह सर्वच धरणांत सावधपणे पाणीसाठा करण्याचे धोरण राबवण्यात आले होते. .आता पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात सर्व धरणांत १०० टक्के पाणीसाठा करण्यात यश आले असून त्यामुळे विद्युत निर्मितीसह सिंचन योजनांसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असेल, पाऊस कायम असल्याने धरणातील विसर्गासह ओढ्या-नाल्यांना पाणी असल्याने नद्याही सध्या तुडुंब आहेत..Water Storage: रब्बीची चिंता मिटली! देशातील प्रमुख धरणांत ९० टक्के पाणीसाठा.कोयना धरणातील विद्युत निर्मिती केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी वर्षभरात ६७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध केला जातो, सिंचनाच्या आवश्यकतेसाठी काहीवेळा त्यात कपात केली जाते, काहीवेळी सिंचनाच्या पाण्यात कपात विद्युत निर्मितीला पाणी द्यावे लागते. यंदा मुबलक पाणी असल्याने विद्युत निर्मितीला पुरेसा साठा मिळणार आहे..दिवाळीत सर्वत्र पाऊस झाला असला, तरी शेतीकामासाठी नदीतून पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याची मागणी नोंदवली आहे. परिणामी, कोयनासह सर्वच धरणांतून सध्या थोडा विसर्ग करता जात आहे. कोयनेतून १०५०, बोम १९३, फाप्छेर २९०, वारणा ६०, दूधगंगा १००, उरमोडी धरणातून ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे..पावसाची स्थिती (मिलिमीटर)धरण यंदाचा पाऊस गतवर्षीचा पाऊसकोयना ४७५१ ५७८७धोम ८०१ १३०६कण्हेर ९३६ १२५९वारणा ३००५ ३९६६राधानगरी ५५६० ५९०५दूधगंगा ४९३८ ४३८१धोम बलकवडी २८०१ ३२४५उरमोडी १५३८ १८३७तारळी १५४६ २५२७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.