Women Farmers: साधने, अवजारांनी केले महिलांचे कष्ट हलके
Agricultural Innovation: परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयांतर्गत ‘कृषीरत महिला’ या राष्ट्रीय प्रकल्पामुळे शेतकरी महिलांचे श्रम, वेदना आणि थकवा कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानरूपी साधने विकसित केली गेली आहेत. ही साधने मोफत वापरण्यास उपलब्ध असून महिलांना शेती कामे सुलभरीत्या करण्यास मदत होत आहे.