Ratnagiri News: ‘कृषी पंढरी ॲग्रो टूरिझम आणि फार्म स्टे’च्या माध्यमातून आपल्याला कोकणाची संस्कृती अनुभवायला मिळणार आहे. यातून तरुणांना शेती व्यवसाय आणि संस्कृतीचे धडे मिळणार आहेत, असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. .येथील कृषी पंढरी ॲग्रो टूरिझम आणि फार्म स्टेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन अध्यक्षस्थानी होते. या वेळी ॲग्रीकल्चर टूरिझम अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन पांडुरंग तावरे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, डॉ. तानाजीराव चोरगे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली चोरगे उपस्थित होते..Agro Tourism: शेती बनले कृषी पर्यटन केंद्र....श्री. निकम म्हणाले, ‘‘कृषी पंढरी ॲग्रो टूरिझम शंभर एकराहून अधिक परिसरात वसले आहे. येथे कोकणातील शेती संस्कृती, फळबागा यासह दोन एकरांत विस्तारलेला जैवविविधता पार्क याशिवाय पोल्ट्री, बदक, गाय, म्हशी, टर्की, ससा, हॅचरिझ, गांडुळखत, खेकडा पालन केंद्र आहे. फळबागामध्ये आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम तसेच दहा एकर परिसरात विविध वाणांची भातशेती आहे.’’.Agro Tourism : बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र.ॲड. पटवर्धन म्हणाले, ‘‘या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना शेती, माती, निसर्ग सर्व अनुभवता येणार आहे.’’.श्री. तावरे म्हणाले, ‘‘निखिल चोरगे या तरुणाने इथे एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. हे केंद्र म्हणजे केवळ कृषी पर्यटन नव्हे तर शेती क्षेत्राशी निगडित विविध शेती व पूरक व्यवसाय अभ्यासाचे केंद्रही ठरेल.’’.डॉ. चोरगे म्हणाले, ‘‘आम्ही या केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना कोकण संस्कृतीची सफर या निमित्ताने घडवणार आहे. भविष्यात शेती क्षेत्राशी निगडित व्यवसायांचे प्रशिक्षण केंद्रही सुरू केले जाणार आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.