Krishi Mahotsav Tuljapur: धाराशिव : शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा, शेतीमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी आणि शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञांमध्ये थेट संवाद घडावा, या हेतून कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वतीने तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. २४ व २५ फेब्रुवारीला तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील सैनिक विद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे..या महोत्सवामध्ये साठ दालने उभारण्यात येणार असून त्यापैकी ३५ दालने शासकीय योजना व प्रकल्पांसाठी तर उर्वरित दालने खाजगी संस्थांसाठी आहे. महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद चर्चासत्र, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन तसेच शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठांची दालने, विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्र व प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण आणि परिसंवादही होणार आहेत. कृषी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून उस्मानाबादी शेळी असणार आहे. .बुलडाणा : कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित.महोत्सवात कृषी संलग्न विभागांचाही सहभाग असणार आहे. कृषी विद्यापीठे, महसूल विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, जलसंधारण विभाग, वन विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, भूजल सर्वेक्षण, सहकार, महिला व बाल कल्याण विकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग आदी विभागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रदर्शन व चर्चासत्रांचा लाभ घेता येणार आहे. कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयाने विविध पिकांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यात सोयाबीन, हरभरा, फळबाग आदींच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत तसेच निर्यातक्षम केळी लागवड तंत्रज्ञान, रेशीम लागवड व्यवस्थापन, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे ऊस शेती उत्पादन व व्यवस्थापन, आंबा लागवड तंत्रज्ञान व मोहोर व्यवस्थापन इत्यादी विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. .असे करा शेततळ्याचे नियोजन ?.कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पंजाबराव देशमुख जैविक मिशन, माहिती विभाग, शेतकरी मासिक, पीएमएफएमई, कृषी यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन आदींसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध करण्यात येणार असून विविध विषयांवरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. राजकुमार मोरे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.