Ahilyanagar News : जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या करमाळा, टेंभुर्णी(जि. सोलापुर) परिसरातील निर्यातक्षम केळीतून चांगले उत्पन्न मिळवत शेतकरी सक्षम होत आहेत. त्याच धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेरसह शेतकरी पुढे येतील अशा भागात केळीचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. .त्यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’ने पुढाकार घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती केली जात असून केळी पिकांचे महत्त्व, केळीचे मिळणारे उत्पन्न आदीबाबत माहितीसाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केळीची लागवड करण्यासाठी अनुदान दिले जात आहे..अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करमाळा, टेंभुर्णी (जि. सोलापुर) भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. यातील बहुतांश केळीची निर्यात होते. एकट्या करमाळा तालुक्यात वीस हजार हेक्टरच्या आसपास केळीचे क्षेत्र असून हा भागा केळीचा हब समजला जाऊ लागला आहे. अकरा महिन्यात येणारे पीक आर्थिक बाबीत शेतकऱ्यांना समृद्ध करत असल्याचा अनुभव आहे. केळीचे साधारण एकरी २५ ते ३० टनापर्यंत उत्पन्न निघते. निर्यातक्षम केळी उत्पादन घेतले तरी २० ते ३० रुपये किलोपर्यंत दर मिळतो. .स्थानिक बाजारात विक्री केली तरी १५ ते १७ रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो. करमाळा, टेंभुर्णी भागाच्या तुलनेत अहिल्यानगर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र फार नाही. सध्या जिल्ह्यात १५५७ हेक्टरवर केळीचे क्षेत्र आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातही केळीचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाच्या आत्माकडून पुढाकार घेतला आहे. .केळीची लागवड करण्यास शेतकरी इच्छुक असलेल्या भागात केळीपिकांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जात आहे. प्रामुख्याने पारनेरमधील जवळा, निघोज, राळेगण, कर्जतमधील भांबोरी, दुधोडी, सिद्धटेक, श्रीगोंदा तालुक्यातील सीना नदीचा परिसर, यासह साधारणपणे पाणी उपलब्ध असलेल्या भागात केळीचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न असून केळी लागवड करण्याची तयारी दर्शवलेल्या भागात शेतकरी गटही केले जात आहेत. .Banana Farming: खानदेशात केळी लागवड रखडत.शेतकऱ्यांच्या केळी लागवडीचा खर्च कमी व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केळीची लागवड करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. त्यात तीन वर्षात २ लाख ८२ हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळते. त्यात पहिल्यावर्षी लागवड आणि अन्य खर्चासाठी १ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. .Banana Farming: सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा वाढल्या.वादळ झाले तर केळीचे अधिक नुकसान होते. दरवर्षी साधारण एप्रिल ते मे महिन्यात वादळ होत असल्याचा अनुभव आहे. रोपे लहान असली तरी हे नुकसान होत नाही. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्यासाठी निर्यातदारांसोबत शेतकऱ्यांच्या भेटी घडवण्यावरही आत्माने पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले.."केळीचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. शेजारच्या करमाळा, टेंभुर्णी भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीचे शेतकरी निर्यातक्षम पीक घेतात. त्यातून बऱ्यापैकी आर्थिक क्षमता तयार होत आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातही केळीचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न असून शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जात आहे. गरजेपुरते पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकरी केळीची लागवड व्हावी असा प्रयत्न आहे."- प्रदीप लाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, अहिल्यानगर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.