Monsoon Update: वारणा, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असल्याने या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. मात्र अलमट्टी धरणातून १ हजार २९७ क्युसेकने विसर्ग वाढवला असून, सध्या १ लाख ५१ हजार २९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे..कोयना आणि वारणा धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी २१.१० फूट इतकी आहे. वारणा धरणात ३०.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी (ता. ४) वारणा धरणातून ६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. .Maharashtra Rain: कोयना, वारणा धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच .वारणा धरणाच्या वक्रदरातून ३६०० तर विद्युत गृहातून १४०० असा एकूण पाच हजार क्युकेसने विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ४४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून २४ हजार ९०८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणात ११०.८४९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. .Almatti Dam Water Discharge: अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक विसर्ग.अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामध्ये १ हजार २९७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवला असून, सध्या १ लाख ५१ हजार २९७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. .सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे - २९००, कण्हेर २८८०, धोम बलकवडी ९२६, उरमोडी ४५०, तारळी २२५, राधानगरी ४२५६, कासारी ११५० क्युसेक विसर्ग सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.