Weather Update: कोयना धरण क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दिलासादायक आणि विक्रमी वाढ झाली आहे. अवघ्या १३ दिवसांत धरणात तब्बल ३५.७८ टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली असून, धरणाचा एकूण जलसाठा आता ४७.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनअखेरीस चिंताजनक पातळीवर असलेला धरणातील साठा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लक्षणीयरीत्या वाढल्याने जलविद्युत निर्मितीबाबतची चिंता कमी झाली आहे..गेल्या २६ जून रोजी सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी ६२१.६१४ मीटर (२०३९ फूट ५ इंच) इतकी होती. त्यावेळी धरणात केवळ १३.९७ टीएमसी (१३.२७ टक्के) एकूण साठा, तर ८.८५ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक होता. मात्र, त्यानंतर धरण क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला..Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस.गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी तब्बल २०.५७४ मीटरने वाढून ६४२.१८८ मीटर (२१०६ फूट ११ इंच) झाली आहे. धरणाचा एकूण साठा आता ४९.७५ टीएमसी झाला असून, त्यापैकी उपयुक्त (लाईव्ह) साठा ४४.६३ टीएमसी (४४.५७ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे..Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस.या विक्रमी वाढीमागे धरण क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस हे प्रमुख कारण आहे. आतापर्यंत महाबळेश्वर येथे सर्वाधिक २,३२२ मिमी एकत्रित पावसाची नोंद झाली असून, नवजा येथे १,९०६ मिमी आणि कोयना येथे १,६३० मिमी पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत नवजा येथे १९२ मिमी, कोयना येथे १५१ मिमी, तर महाबळेश्वर येथे १३२ मिमी पावसाची नोंद झाली..८९,५१० क्युसेक वेगाने पाण्याची आवकमुसळधार पावसामुळे धरणात सध्या प्रति सेकंद ८९,५१० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून दररोज सुमारे सात ते आठ टीएमसी पाण्याची भर धरणात पडत आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास पुढील १२ ते २४ तासांत धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांचा टप्पा सहज ओलांडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.