Koyna Dam Water : कोयनेतून पाणी सोडण्यासाठी पुतळे आज जाळणार
Water Protest : कऱ्हाड भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्षात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत आज निर्णय न झाल्यास गुरुवारी (ता. २९) सांगलीतील स्टेशन चौकात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळून निषेध नोंदवू. तसेच जनतेला सोबत घेऊन स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडू, असा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.