Water Scarcity: सातारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून मे महिन्याच्या उत्तरार्धात जलसंकटाचे सावट गडद झाले आहे. सातारा सिंचन मंडळाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये आता केवळ २२.२४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यातच जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कोयना धरणाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून, धरणात अवघा १७.३१ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी पातळी कमालीची खालावल्याने आगामी पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे..कोयना धरणात सध्या १७.३४ टीएमसी पाणी शिल्लक असून गेल्या वर्षी याच काळात तो २१.४९ टीएमसी इतका होता. धरणातील या घटत्या साठ्यामुळे पश्चिमेकडील वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचन व्यवस्था या दोन्हींवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. मध्यम प्रकल्पांचा विचार केला तर येरळवाडीसारख्या (३.३७ टक्के) धरणांनी पार तळ गाठला आहे. .Ahilyanagar Dams Water Level: अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत ३५ टक्क्यांवर पाणीसाठा.सुदैवाने कण्हेर (४१.४६ टक्के) आणि उरमोडी (३८.११ टक्के) प्रकल्पांची स्थिती बऱ्यापैकी समाधानकारक असल्याने काही भागांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी एकंदरीत परिस्थिती गंभीर आहे..Dams Water Levels: कोल्हापुरातील धरणांत ४४ टक्के साठा.जून महिन्यात पाऊस लांबल्यास जिल्ह्यात तीव्र जलसंकट उभे राहू शकते. ग्रामीण भागात विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने पिके करपण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या संभाव्य पाणीबाणीवर मात करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. .उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवणे, सिंचनाची आवर्तने मर्यादित करणे आणि अवैध पाणी उपशावर कडक निर्बंध आणणे आवश्यक झाले आहे. तसेच, नागरिकांनीही पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.