Murud News: कोकणात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्तांना कोर्लईच्या लालचुटूक रताळ्यांची विशेषप्रतिक्षा असते. रायगड जिल्ह्यात सर्वात मोठा रताळ्यांचा बाजार दरवर्षी मुरूड शहरात भाजीमार्केटमध्ये भरत असतो. .या बाजाराला शतकांची परंपरा असल्याचे महिला बचत गटाच्या प्रमुख मारिस्त्रास रुझारियो व क्रेसेस मार्तीस सांगतात. मुरुडच्या बाजारात ७० ते ७५ क्विंटल रताळ्यांची आवक एकट्या कोर्लई गावातून होते. वाशी मार्केटमधील रताळ्यांच्या तुलनेने कोर्लईच्या गावठी वाणाला खवय्यांची पहिली पसंती असते..Sweet Potato Cultivation : मेळघाटात ‘केव्हीके’कडून रताळू लागवडीला प्रोत्साहन .या व्यवसायावर कुटुंबीयांची ४ ते ६ महिन्यांची आर्थिक गुजरण होते, असे विक्रेते सांगितात. साधारणतः अडीच महिन्यांचे हे पीक असून यंदा रताळ्यांचे पीक कमी आले आहे..बाजारात १५० रुपये प्रतिकिलो मोठे तर लहान आकाराचे ११० ते १२० रु. प्रतिकिलो विक्री दर सुरू आहे. रताळ्याचा उपवासाव्यतिरिक्त कोकणातील पोपटी प्रकारात सर्रास केला जातो म्हणून रताळ्यांनी मोठी मागणी असते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.