Agri Updates : बुलडाणा मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्पाची जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी पाहणी केली. उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत त्यांनी सिंचनासाठी पाणी देता येईल का आणि पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कसे निश्चित करता येईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली..कोराडी मध्यम प्रकल्प परिसराची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवहार्यता तपासण्यास सांगितले. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले..Summer Vinecrop Care: उन्हाळ्यात वेलवर्गीय पिकांची काळजी कशी घ्याल? सोपे आणि प्रभावी उपाय.पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून पाणीटंचाईच्या परिस्थितीची माहिती घेतली. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली. .Ridge Planter: एकाच वेळी सरी, पेरणी आणि खत देणारे सरी वरंबा प्लांटर कसे काम करते?.या पाहणीवेळी मेहकर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराजे कापरे, उपाध्यक्ष अलीम ताहेर, पाटबंधारे उपविभाग, मेहकरचे उपविभागीय अभियंता दुष्यंत देवरे, सहायक अभियंता सु. चे. गावित, कनिष्ठ अभियंता अपेक्षा खैरकर, कालवा निरीक्षक सतीश वाटसर आणि कर्मचारी राहुल बळी उपस्थित होते..कृषी व महसूल विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, सहायक कृषी अधिकारी प्रफुल्ल जाधव, नायब तहसीलदार नालट व बोरकर, मंडळ अधिकारी राजू आव्हाळे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. टी. कुलाल उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत प्रशासक किशोर गाभणे, ग्रामसेवक कैलास वानखेडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.