Raigad News : अन्न आणि औषध प्रशासनाला सणासुदीच्या दिवसांत मिठाईत होणारी भेसळ रोखण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळामुळे विविध अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागांवर प्रशिक्षणार्थी औषध व अन्न निरीक्षकांच्या नियुक्त्या करताना पेण-रामवाडी येथे कोकण विभागीय प्रयोगशाळादेखील सुरू केली जाणार असल्याने भेसळखोरांच्या चालुगिरीला लगाम लागणार आहे. .ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये अन्न भेसळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सणासुदीच्या काळात मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अखाद्य रंग आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा वापर वांरवार निदर्शनास आला आहे..Adulteration Issue: दूध, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालन कार्यक्रमांची गरज.अशा प्रकरणात अन्न सुरक्षा विभागाने तत्काळ कारवाई करत भेसळयुक्त मिठाईचे नमुने जप्त केले आहेत, पण प्रयोगशाळेअभावी तपासणीतील दिरंगाईमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखणे आणि भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात विविध अडचणी उद्भवत आहेत..तक्रार करा !भेसळयुक्त मिठाईमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न सुरक्षा विभागाने दिला.मिठाई खरेदी करताना दुकानाचा परवाना, गुणवत्ता आणि पॅकेजिंगवरील बेस्ट बिफोर तारीख तपासावी. संशय आल्यास तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन विबागाकडून करण्यात आले आहे..पेण येथे विभागीय प्रयोगशाळाकोकण विभाग सर्वाधिक विकसित होत असलेला विभाग दळणवळणासाठी खूपच कठीण विभाग आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अधिकारीच नाहीत. या स्थितीवर मात करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनामध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. .Milk Adulteration: ‘मिल्क स्कॅन चाचणी’द्वारे दूधभेसळ रोखणार : मंत्री कदम.त्यातून रायगड जिल्ह्यात सहा प्रशिक्षणार्थी दाखल झाले आहेत, तर रामवाडी येथे कोकण विभागीय प्रयोगशाळेसाठी जागेची निवड केल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले..कारवाईतील अडथळेनिरीक्षकांची कमतरता : रायगड जिल्ह्यात अन्न निरीक्षकांची १२ पदे मंजूर आहेत, यातील दोनच पदे भरलेली होती.प्रशासकीय दिरंगाई : तक्रार केल्यानंतर दुर्गम भागात अधिकारी पोहोचत नसल्याने तत्काळ कारवाई होत नाही. तपासणी मोहीम राबवणे, मिठाईचे नमुने गोळा करणे, प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठवणे यामध्ये विलंब होतो.जनजागृतीचा अभाव : मिठाई खराब असली तरी तक्रार कुठे करायची याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी होते.अतिरिक्त कार्यभार : कमी मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे कामाची गुणवत्ता, गतीवर परिणाम..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.