Railway Financial Performance: कोकण रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरूळ येथील ‘कोकण रेल विहार’ येथे ध्वजवंदन केल्यानंतर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आढावा घेतला. सध्या कोकण रेल्वेच्या अखत्यारीत सुमारे २३,५०४ कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. .प्रवासी सुविधांच्या विकासासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २०.५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त थ्री-ई डबे, तर वांद्रे-मडगाव आणि मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त थ्री-एसी डबे जोडण्यात आले आहेत. कणकवली येथे वातानुकूलित विश्रांती कक्ष सुरू करण्यात आला आहे..Rural Development: बिकट वाटेवरून विकासाची उत्तुंग झेप.जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत कोकण रेल्वेने १० हजारांहून अधिक गाड्या, २४५ उन्हाळी विशेष गाड्या आणि ३,७८५ मालगाड्या चालविल्या. याशिवाय ३७ विशेष वाहतूक गाड्या चालविण्यात आल्या. या कालावधीत एकूण रेल्वे वाहतुकीत मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढ झाली. वाहतूक महसूल ९४३.७४ कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे..Rural Development Success: युवाशक्ती सरसावली, विकासाला गती मिळाली .सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्यमडगाव सेंट्रल येथील पादचारी पूल पाडण्याचे काम विविध विभागांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या कामात सहभागी पथकाला तीन लाखांचे सामूहिक बक्षीस जाहीर करण्यात आले. .प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी असाधारण सतर्कता दाखविणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांनाही वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे ‘रेल्वे’ने सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. प्रवासी सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्ये ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत ९०.५५ लाख रुपयांच्या २०६ वस्तू त्यांच्या मालकांना परत करण्यात आल्या. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ५६ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना बाल हेल्पलाइनच्या ताब्यात देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.