Indian Agriculture: भुईमूगफुलोरा ते आरे फुटण्याची अवस्थाभुईमूग पीक सध्या फुलोरा ते आरे फुटण्याच्या अवस्थेत असल्याने, पिकाच्या गरजेनुसार ८–१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ होऊन उत्पादनात घट येऊ शकते..चवळीफुलोरा ते शेंगा अवस्थाचवळी पीक सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्याने, पिकाच्या गरजेनुसार हलके पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट होऊ शकते.चवळी पिकातील शेंगा काढणीस तयार झाल्यास, परिपक्व शेंगा तडकणे टाळण्यासाठी शक्यतो सकाळच्या वेळेत शेंगांची काढणी करावी. काढणीनंतर शेंगा ४ ते ५ दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी..आंबामोहर ते फळधारणाआंबा बागेत फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, स्पिनोसॅड (४५ टक्के एससी) २.५ मिलि प्रति १० लिटर पाणी.प्रादुर्भाव जास्त असल्यास थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी करावी.(टीप : मोहर सुरू झाल्यापासून फळधारणेपर्यंत कीटकनाशकांची फवारणी टाळावी. फवारणी अत्यावश्यक असल्यासच करावी. परागीभवनाच्या कालावधीत फवारणी करणे टाळावे. जेणेकरून परागीभवन करणाऱ्या कीटकांना कोणतीही हानी होणार नाही.).Konkan Crop Advisory: कृषी सल्ला; कोकण विभाग.आंबा फळांचे फळमाशीपासून, प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ बाय २० सें.मी. आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी..फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा फळांची गळ होते. अशा परिस्थितीत बागेतील गळून पडलेली फळे वेळीच गोळा करून नष्ट करावीत. फळमाशीपासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर २ या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत.आंबा पिकामध्ये मोहर आल्यानंतर फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तीन फवारण्या कराव्यात. पालाश अन्नद्रव्यामुळे फळांचे वजन व आकार वाढण्यास मदत होते. तसेच फळांची गुणवत्ता सुधारते. यामुळे साखर व आम्लता यांचे प्रमाण संतुलित राहून फळांच्या सालीसह आतील गराला आकर्षक रंग प्राप्त होतो. याशिवाय फळांचा टिकाऊपणा वाढतो. फळातील साक्याचे प्रमाण कमी होते..Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग.दमट हवामानामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल ५ मिलि किंवा पाण्यात विरघळणारे (८० टक्के) गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे फळधारणा झालेल्या बागेत शक्य असल्यास प्रति कलम १५० ते २०० लिटर पाणी १५ दिवसांनी द्यावे. अशा प्रकारे पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देणे बंद करावे. जेणेकरून आंब्याच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही..काजूबी व बोंडूच्या वाढीची अवस्थादमट वातावरणामुळे काजूवरील ढेकण्या (टी मॉस्किटो बग) आणि फुलकीड यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही कीड नवीन पालवी आल्यापासून ते फळधारणेपर्यंत उपद्रव करते. ही कीड मोहरातील व नवीन पालवीतील रस शोषून घेते. त्यामुळे मोहर सुकून जातो व फळे गळतात. या किडीचा आणि फुलकिडीचे एकत्रित नियंत्रण करण्यासाठी नवीन पालवी फुटण्यावेळी मोहर फुटतेवेळी आणि फळधारणेवेळी खालील रासायनिक कीटकनाशकांच्या तीन फवारण्या कराव्यात..पहिली फवारणी : लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलिदुसरी फवारणी : प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मिलितिसरी फवारणी : लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलिप्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.काजूमध्ये बोंड व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यासक्विनॉलफॉस (२५ टक्के ई.सी.) २.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- डॉ. वैभव राजेमहाडीक ९४२०६७३२६७- डॉ. यशपाल चव्हाण ८१४९४६७४०१(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.