Nanded News: श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त गुरुवारी (ता. २५) पारंपरिक शंकरपट (बैलजोडी बैलगाडी शर्यत) स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या एकूण ३८ बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत माळेगावच्या माळरानावर प्रचंड थरार निर्माण केला. स्पर्धा पाहण्यासाठी भाविक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती..शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, उपअभियंता श्री. राठोड, दिनेश महेर, चंद्रकांत जाधव, पोलिस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, श्री. आईलाने, नायब तहसीलदार श्री. मेकाले आदी उपस्थित होते. .Bullock Cart Race : नाधवडे बैलगाडा शर्यतीत वेगाचा थरार.स्पर्धेदरम्यान वेगवान, शिस्तबद्ध आणि ताकदवान बैलजोड्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक फेरीदरम्यान टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या आणि जल्लोषात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शेतकरी जीवनशैलीचे जिवंत दर्शन घडविणारी ठरली. .Bullock Cart Race Sangli : सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा थरार, हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या पटकावली २२ लाखांची थार.या स्पर्धेत कोंडिबा मोहन कोरडे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. अवघ्या ४ सेकंद ३९ पॉइंटमध्ये त्यांनी शर्यत पूर्ण करत बाजी मारली. अमोल देविदास राठोड यांनी ४ सेकंद ४२ पॉइंटमध्ये धाव घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आश्विनी दिलीप मंदाडे आणि बालाजी माणिकराव कदम यांना विभागून देण्यात आले..बैलगाडी शर्यतीचे निकाल (वेळ- सेकंद/पॉइंट)कोंडिबा कोरडे - ४.३९अमोल राठोड - ४.४२अश्विनी मंदाडे- ४.४३बालाजी कदम- ४.४३प्रदीप सानप- ४.५५प्रतीक दळवी -४.६१भगवान जाधव -४.६१संदीप कल्याणकर - ४.६१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.