Kolhapur News: येथील तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्हैस पळविणे स्पर्धेत कोल्हापूरच्या विराज ससे यांच्या म्हशीने, तर श्वान शर्यतीत हेरले येथील प्रज्ज्वल इरले यांचा डॉन प्रथम क्रमांक पटकाविला..तात्यासाहेब कोरे यांच्या ३१ व्या स्मृतीदिनानिमित्त म्हैस पळविणे व श्वान धावणे स्पर्धा पार पडल्या. म्हैस शर्यतीत (कै.) राजू बजाटे (कोल्हापूर) यांच्या म्हशीने दुसरा, कळंबा येथील सागर बराले यांच्या म्हशीने तिसरा, तर केदार वसंत पाटील (गिरोली) याच्या म्हशीने चौथा क्रमांक मिळवला..Thrilling Bull Race : बैलांची चिखलातली झुंजार स्पर्धा ; पारंपरिक खेळाचा गावरान थरार.श्वान शर्यतीत हेरले येथील प्रज्वल इरलेयांचा श्वान डॉन ने ५०० मी अंतर ३६.२० सेकंदामध्ये पार करून या स्पधेतील प्रथम पटकावला. विक्रम सुर्वे ( रा. चाफेडे ) यांच्या महाकाळ श्वानाने ३६.९४ सेकंदामध्ये अंतर पार करत दुसरा नंबर पटकावला. .Bullock Cart Race Sangli : सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा थरार, हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या पटकावली २२ लाखांची थार.बाळूमामा ( बोरवडे ) यांच्या ब्लॅकी श्वानाने ३७.३४ सेकंदामध्ये अंतर पार करत तिसरा क्रमांक मिळविला. सूरज पाटील याच्या जानू श्वानाने ३७.३९ अंतर पार करून चौथा, बाळू मामा भागाईवाडा यांच्या वस्ताद श्वानाने ३७.८२ अंतर पार करून पाचवा क्रमांक पटकावला..विजेत्या म्हशीच्या मालकांना वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बँकेचे संचालक प्रमोद कोरे, डॉ. प्रताप पाटील, शेतीपूरक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष आर. वाय. खोत, दीपक पाटील, जीवनकुमार शिंदे, विश्वास राबाडे, राजेंद्र पाटील उपस्थित होते. पंच म्हणून पिंटू भोसले, धनाजी चिले, शिवाजी सरनाईक, बंडा जांभळे यांनी काम पाहिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.