Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निकालात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आणि ग्रामीण राजकारणाचा कणा असलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्षच वरचढ ठरला आहे. त्याचवेळी महापालिकेप्रमाणेच पक्ष म्हणून काँग्रेसही भारी ठरणार आहे. एकत्रित महायुती म्हणून सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. दुपारी ४ पर्यंत ६८ पैकी ५७ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीला (अजित पवार गट) १७, काँग्रेस १४, भाजप १२, शिवसेना ७, शाहू आघाडी ४ (यड्रावकर यांची), शिवसेना उबाठा, १ जनसुराज्य १ आणि अपक्ष १ जागा मिळवल्या. निकालाचा कल जाहीर होताच सर्वत्र गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली..चारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, महायुतीतील घटक पक्षांना जोरदार यश मिळाल्याने जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीने ७ पैकी ४ जागांवर विजय मिळवला..Local Body Results: नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपचे वर्चस्व.गगनबावडा तालुक्यातील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २ तर पंचायत समितीच्या ४ अशा सर्वच ६ जागा जिंकून काँग्रेसच्या आमदार सतेज पाटील गटाने गगनबावडा तालुक्यातील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. चंदगडमध्ये निकालाचा कल राष्ट्रवादीच्या बाजूने स्पष्ट दिसत होता. विरोधी भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नव्हती. .Local Body Result: अकोल्यात भाजपच ठरला मोठा पक्ष .फेरीनिहाय निकाल जाहीर होईल तसे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. सहाव्या फेरीनंतर गुलालाची उधळण सुरू झाली. चंदगडमध्ये राष्ट्रवादीला ३, भाजपला १ तर पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीचे ५ व भाजपचे ३ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर होते. भुदरगड तालुक्यात ४ पैकी शिवसेनेने(शिंदे गट) ३ तर शिवशाहू आघाडीने १ जागा मिळवली होती. शाहूवाडीत जनसुराज्यने २ तर राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाने एका जागेवर विजय मिळवला होता. .आजऱ्यात २ जागावर राष्ट्रवादी, गगनबावड्यात २ जागावर काँग्रेसने विजय मिळवला होता. कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ, अमरजितसिंह घाटगे व संजय घाटगे यांच्या युतीने जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा तर पंचायत समितीच्या १२ पैकी ११ जागा जिंकत विजयाचा झेंडा फडकावला. तिघांच्या तगड्या युतीसमोर शिवसेना (शिंदे गट)च्या प्रा. संजय मंडलिक यांनी एकाकी झुंज दिली. राधानगरीत ३ काँग्रेस एक राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) प्रत्येकी एक असे बलाबल राहिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.