Kolhapur Zilla Parishad Election Results Updates: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी जवळपास सर्व जागांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ काँग्रेसने १५ जागा जिंकल्या. तर भाजपने १२, शिंदे सेनेने ९ जागांवर विजय मिळवला. तर जनसुराज्य पक्षाला ५ जागा आणि यड्रावकर गटाला ४ जागा मिळाल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तर एक अपक्ष निवडून आला आहे. अशाप्रकारे कोल्हापुरात महायुतीची सत्ता आली आहे. .या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, चंदगडचे भाजपला पाठिंबा दिलेले आमदार शिवाजीराव पाटील आणि जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांना त्यांच्या मतदारसंघातच धक्का बसला. .आवाडेंच्या चौथी पिढीचं राजकारणात पदार्पण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयाने आवाडे कुटुंबातील चौथ्या पिढीने राजकारणात पदार्पण केले आहे. .Zilla Parishad Panchayat Samiti Elections Results Live: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा- मुख्यमंत्री फडणवीस.शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वर्चस्व कायम राखले आहे. तर गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील याचा पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात पराभव झाला. विश्वास पाटील यांनी ऐनवेळी काँग्रेसची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता..Parbhani ZP Election Results: परभणीकरांनी घराणेशाहीला नाकारलं, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील चौघांचा पराभव.अशोकराव माने यांना धक्काकोल्हापूर जिल्ह्यातील रुई जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार राजीव आवळे यांचे पुत्रे आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांचे पुतणे राहुल आवाळे यांनी १३१ मतांनी विजयी झाले. येथे सुहास राजमाने यांचा पराभव झाले. ते विद्यमान आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक आहेत. चंदगड तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात २३ वर्षीय मानसी भोगण विजयी झाल्या. त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत यश मिळवले आहे..कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता स्थापन होईल- मुश्रीफया निवडणुकीच्या निकालावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून दिल्याबद्दल त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ''हा विजय आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या चरणी अर्पण करीत आहोत. आज अजितदादा हयात असते तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होत आहे हे पाहून त्यांना अत्यानंद झाला असता. आज ते आपल्यामध्ये हयात नाहीत, याची खंत आम्हाला लागून राहिलेली आहे.'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता स्थापन होईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे..कोल्हापूर जिल्हा परिषद; कुणाला किती जागा?काँग्रेस- १५भाजप -१२राष्ट्रवादी काँग्रेस- १८शिंदे शिवसेना- ९यड्रावकर गट- ४जनसुराज्य- ५स्थानिक आघाडी- २ठाकरे शिवसेना- १स्वाभिमानी शेतकरी संघटना- १अपक्ष- १.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.