कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण कोल्हापूर- सांगली महामार्गावरील निमशिरगाव जवळ ऊस वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पेटवलेआंदोलक आणि कारखानदारांमध्ये कोणतीही चर्चा नाही.Kolhapur Sugarcane Price Protest: कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर- सांगली महामार्गावर असलेल्या निमशिरगाव (ति. शिरोळ) जवळ मंगळवारी रात्री ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अनोळखी व्यक्तींनी पेटवून दिले. यामुळे वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाहन पेटवणाऱ्या अनोळखी व्यक्ती घटनास्थळावरुन पसार झाल्या. ते चेहरा झाकून आले होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. .राज्यातील साखर हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले आहेत. पण काही कारखान्यांनी अपेक्षित दर जाहीर केला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्याकडून कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक रोखली जात आहे. .आवाडेंच्या कारखान्याची ऊस वाहतूक रोखलीदरम्यान, हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याला होणारी ऊस वाहतूक अडविण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाने भरलेला ट्रॅक्टर अडवला. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि संचालक यांच्यातील झालेल्या चर्चेनंतर उसाचा ट्रॅक्टर सोडण्यात आला. .Sugarcane Price: उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांचा ऊस कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांना.यंदाच्या हंगामातील तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात एकरकमी पहिली उचल देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी कारखानदारांना १० नोव्हेंबरची डेडलाईन दिली आहे. कारखानदारांसाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, अद्याप आंदोलक आणि कारखानदारांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. यामुळे ऊसदराचे आंदोलन पेटले असून जिल्ह्यातील काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखून आंदोलन केले जात आहे. .Sugarcane Price Protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले, अपेक्षित दर नाही अन् काटामारी, यड्रावकरांच्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली.आंदोलन अंकुश संघटनेकडून आंदोलन सुरुच आहे. आमदार यड्रावकर यांच्या कारखान्याविरोधात त्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले. कोथळीतून आलेले उसाचे वाहन आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी परत पाठवले. ते आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या अंकली टोल नाक्यावर आंदोलन करणार आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.