Kolhapur Shahi Dasara: देशात म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला मान आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला यावर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला. यंदा हा राज्यातील प्रमुख महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने जिल्ह्यात २२ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. २२ सप्टेंबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौक मैदानात झाले होते. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम भव्य अशा मंचावर सादर होत आहेत. .२५ सप्टेंबर रोजी देशातील सात राज्यांतील तब्बल ११७ कलाकारांनी आपल्या लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण केले. दसरा चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध लोककला, नृत्यप्रकार आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. .Dussehra Festival : दसरा म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो?.२७ सप्टेंबर रोजी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या नगरीत शाही दसरा महोत्सवाने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा दिला. शाही दसरा महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या “महाराष्ट्राची लोकसंस्कृती” या विशेष कार्यक्रमाने दसरा चौकाला लोककलेच्या रंगमंचात रूपांतरित केले. कोळी नृत्य, रेला काठी नृत्य, जोगवा, दिवली नृत्य, पालखी नृत्य, काठ खेळ, वाघ्या मुरुळी आणि जागरण गोंधळ यांसारख्या पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या. .तर सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी मंडप परिसरात १० पथकांद्वारे युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. .Chana Cultivation : दसरा सणाला हरभरा पेरणीची अडचण.प्रमुख उत्सव विजयादशमीलाया महोत्सवातील प्रमुख उत्सव दरवर्षी विजयादशमीला दसरा चौकात साजरा होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. ही पंरपरा कोल्हापूरच्या वैभव आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. न्यू पॅलेसपासून शाही मिरवणूक निघते, ही या सोहळ्याचे मुख्य आकर्षण आहे. या मिरवणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि त्यांच्या कुंटुंबातील सदस्य, त्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग असतो. सजवलेले हत्ती, घोडे आणि छत्रपतींची मेबॅक कार अथवा पारंपरिक बग्गी अशी शाही थाटात ही मिरवणूक निघते. .छत्रपतींच्या घराण्यातील सदस्य हे सिमोल्लघनांसाठी मेबॅक कारमधून दसरा चौकात येतात. या मिरवणुकीत पुरुष केशरी रंगाचे फेटे, कुर्ता आणि पायजमा अथवा धोतर, तर स्त्रिया नऊवारी साडीत, अशा पारंपरिक पोशाखात असतात. हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. यात सर्वात मोठे आकर्षण असते तो म्हणजे सोने लुटण्याचा कार्यक्रम. यावेळी एकमेकांना भेटून आपट्याच्या पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.