Kolhapur News : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसाठी नंबर प्लेट रेकगनायझिंग प्रकल्प सर्वप्रथम दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील अंकली टोल नाक्यावर राबविण्यात आला. ‘गुरुदत्त शुगर्स’च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी योगदान दिल्याचे विशेष समाधान असल्याचे प्रतिपादन, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. .कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिसांना महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नंबर प्लेट रेकगनायझिंग प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच झाले. अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. .Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक.या वेळी अध्यक्षस्थानावर बोलताना श्री. घाटगे म्हणाले, की ‘गुरुदत्त शुगर्स’ने नेहमीच सामाजिक भावनेने कार्य केले आहे. शेतकरी हिताचे धोरण राबवत असताना शहरातील लोकोपयोगी उपक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला आहे. .Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट.शिरोळ तालुक्यात महापुराच्या काळात पूरग्रस्त आणि जनावरांसाठी विशेष कार्य करण्याचे समाधान मिळाले. .टेक्निशियन आशिष शेट्टी यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली. या वेळी उद्योगपती विनोद घोडावत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने-देशमुख, संचालक शिवाजी सांगले-जाधव, माजी नगराध्यक्ष विनोद चोरडिया, विजय माणगावे, अशोकराव कोळेकर, राजेंद्र नांद्रेकर, माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके, उपस्थित होते. प्राजक्ता पाटील, स्वाती भापकर यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.