कोल्हापूर शहरातील मुख्य वस्तीत बिबट्या घुसल्याने एकच खळबळ सुरुवातीला बिबट्या हॉटेल वूडलँडमध्ये घुसलात्यानंतर तो महावितरणाच्या कार्यालयातील चेंबरमध्ये लपून बसलात्याने तिघांवर हल्ला केला दोन तासांत त्याला पकडण्यात यश.Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरातील मुख्य वस्तीत मंगळवारी बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला हा बिबट्या हॉटेल वूडलँडमध्ये घुसला. त्यानंतर तो महावितरणाच्या कार्यालयातील चेंबरमध्ये लपून बसला. त्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये काम करत असलेल्या माळीवर तसेच नंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करणाऱ्या युवकावरही हल्ला केला. .दरम्यान, त्याने वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर हल्ला केला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. सदर बिबट्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. यामुळे शहरात खळबळ उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी पोलिस, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करत त्याला दोन तासांत जेरबंद केले. .Leopard Terror: मंचर परिसरामध्ये २० बिबट्यांचा वावर.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जाळीत पकडण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, वन विभागाने बिबट्याचा संचार असलेला परिसर सील केला होता. बिबट्याच्या हालचालीवर वन कर्मचारी, पोलीस लक्ष ठेवून होते. अखेर त्याला पकडण्यात आले आहे. .Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू.हा बिबट्या थेट कोल्हापूर शहरातील वस्तीत कसा पोहोचला. याचा शोध घेतला जात आहे. याआधी २०१५ मध्ये रुईकर कॉलनीत बिबट्या आला होता. आता पुन्हा कोल्हापूर शहरात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.