Kolhapur News : जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस सुरु झाल्याने याचा फायदा भातासह अन्य खरीप पिकांना होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी उसाव्यतिरिक्त पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८० हजार ७४७ हेक्टर असून, आतापर्यंत केवळ १ लाख ६३ हजार १४१ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. .पेरणीची ही टक्केवारी ९०.२६ टक्के आहे. यामध्ये भाताचे ८६ हजार ३४७ हेक्टर, खरीप ज्वारी ५१८ हेक्टर, नागली १४ हजार ७८२ हेक्टर, मक्का २८२ हेक्टर, इतर तृणधान्ये ३६७ हेक्टर, तुरीची लागवड १६५ हेक्टर, मुगाची लागवड २७९ हेक्टर, उडदाची लागवड ४२९ हेक्टर, इतर कडधान्ये ३५९ हेक्टर आणि सोयाबीनची लागवड ३६ हजार ४२६ हेक्टर, भुईमुगाची लागवड २३ हजार ३७ हेक्टर, कारळ्याची लागवड १३९ हेक्टर, इतर तेलबियांची पेरणी ९ हेक्टरवर झाली आहे..Kharif Crop Loss : पावसाचा खंड; खरीप पेरा अडचणीत.मे महिन्याच्या मध्यापासूनच पेरणीपूर्व मशागतीच्या काळातच पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना मुळातच फार उशीर झाला. जूनमध्येही खरीप पेरण्या पूर्णपणे होऊ शकल्या नाहीत..Kharif Crop : सोयाबीन, कापूस जोमात; दमदार पावसाची गरज.त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्याची सुरुवात केली. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतला आहे. जिल्ह्यात ९०.२६ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत..तालुकानिहाय पेरणी (हेक्टर)गडहिंग्लज २५ हजार ४१२हातकणंगले १७ हजार २७६कागल १६ हजार ५१७चंदगड १८ हजार ६९०शिरोळ २ हजार २३३पन्हाळा १२ हजार २६२शाहूवाडी ११ हजार ४१९राधानगरी १३ हजार ४३१गगनबावडा १८०८करवीर ११ हजार ५५७भुदरगड १९ हजार २१८आजरा १३ हजार ३२३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.