Agricultural Finance: कोल्हापूर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात ४७ हजार कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. सर्व बँकांनी समन्वयाने काम करून खरीप पीक कर्ज वितरणाचे जुलैअखेर १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले..जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँक (बँक ऑफ इंडिया) यांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा २०२६-२७ तसेच आरसेटीच्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले..Agricultural loans: शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील ठेवी काढून घ्या .डॉ. राठोड म्हणाले, पीक कर्ज योजना आणि इतर शासकीय योजनांअंतर्गत बँकांकडे प्राप्त होणारी कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. सर्व शासकीय योजनांतील कर्ज प्रकरणांची सप्टेंबरअखेर उद्दिष्टपूर्ती व्हावी. शासन व महामंडळांच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँका आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे..बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये जिल्ह्यासाठी ४२ हजार २०० कोटी रुपयांचे पतपुरवठा उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मार्च २०२६ अखेर त्यापैकी ११४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सर्व बँकांचे अभिनंदन केले..Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना.जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांनी सांगितले की, नव्या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी ८ हजार कोटी रुपयांची तरतूद असून, त्यापैकी पीक कर्जासाठी ३ हजार ९०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे..यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बचत गटांना पतपुरवठा, पीएम स्वनिधी आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकांच्या जिल्हा समन्वयकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला..बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंडके, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्रनाथ श्रीवास्तव, नाबार्डचे.जिल्हा विकास व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंधळे आणि आरसेटीचे संचालक प्रशांत कापूरकर उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.