Kolhapur News: शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा, वीजपुरवठा दुरुस्ती व देखभालीसाठी ऑनलाइन तक्रार नोंदणी सुविधा सुरू करावी, प्रत्येक गावासाठी नियमित लाइनमन नियुक्त करावा, .यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलकांच्या प्रश्नांवर सोमवारी (ता. १६) महावितरण कार्यालयात बैठक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कार्यकारी अभियंता मसू मिसाळ यांना दिले..Farmers Protest: बियाण्यांच्या गुलामगिरीविरुद्ध लढावेच लागेल.किसान संघाचे प्रांत महामंत्री मदन देशपांडे, जिल्हाध्यक्ष बाबगोंडा पाटील व जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतीपंपधारक शेतकऱ्यांच्या मोर्चाला दुपारी बारा वाजता ताराबाई पार्क येथील सासने मैदान येथून सुरुवात झाली. .Farmers Protest: शेतीला दिवसा विजेसाठी शिराळा वितरण कार्यालयासमोर ठिय्या .दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बस स्थानक, पुन्हा दाभोळकर कॉर्नर, किरण बंगलामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘जोपर्यंत महावितरणचे अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार नाही,’ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली..त्यामुळे बराचवेळ आंदोलक या ठिकाणी थांबून होते. अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता मसू मिसाळ या ठिकाणी आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन देऊन चर्चा केली. आंदोलनात जिल्हामंत्री सचिन जाधव, बाबासाहेब कूट, विपुल चव्हाण, मनीष कुलकर्णी, अमरनाथ घुगरी, अशोक पाटील, रामभाऊ पाटील यांच्यासह शेती पंपधारक शेतकरी सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.