Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) १३६ कोटींच्या दूधदर फरकातील डिबेंचर म्हणून कपात केलेली ४५ टक्के रक्कम दूध संस्थांना परत करावी, यासह दूधदरात वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १६) दूध संस्था व उत्पादकांनी ‘गोकुळ’च्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. .१३६ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळने जाहीर केली होती. त्यातील तब्बल ४० टक्के इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ऐन दिवाळीत कमी प्रमाणात फरक द्यावा लागणार आहे. म्हणूनच एकतर फरक रक्कम वाढवा किंवा कपात रक्कम सर्वांना परत द्या, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली..Gokul Dudh Utpadak Morcha: 'गोकुळ'वर धडकला दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा, डिबेंचर कपातीवरुन मुश्रीफ विरुद्ध महाडिक संघर्ष वाढला.गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगेकर यांच्यासह जिल्ह्यातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दूध उत्पादकांनी या मोर्चावेळी गायी, म्हशी सोबत आणल्या. .गाईचे पूजन करून कोल्हापुरातील सर्किट हाउस येथून या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा थेट ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर धडकला. मोर्चात मोठ्या संख्येने दूध उत्पादक सहभागी झाले. गोकुळने दरवर्षीपेक्षा अधिक रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्था संतप्त झाल्या आहेत..Gokul Politics: 'शेतकरी संवेदनशील, पण १२ दिवसांत एकही बैठक नाही...'; 'गोकुळ'च्या डिबेंचर कपातीवरुन शौमिका महाडिकांचा हल्लाबोल.यामुळे दूध संस्थांना सभासदांना दिवाळीचा दूध दर फरक वाटप करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गोकुळच्या या निर्णयाविरोधात मागील आठवड्यात दूध उत्पादकांनी गोकुळ कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषणही केले होते. डिबेंचर म्हणून कपात केलेले पैसे दूध संस्थांच्या खात्यावर जमा करावेत. .हे पैसे दूध संस्थांना देता येत नसतील तर ते जिल्ह्यातील दूध उत्पादकांना द्यावेत, जेणेकरून त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे. डिबेंचर कपातीच्या मुद्यावर गेल्या १२ दिवसांत एकही बैठक झालेली नाही. याच्यावर केवळ तांत्रिक गोष्टी सांगितल्या जातात. चार प्रतिनिधी बोलावून यावर सुवर्णमध्य काढणे गरजेचे असल्याचे मत संचालिका महाडिक यांनी व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.