Biogas Beneficiaries: बायोगॅस योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार १ कोटी ३० लाख ३२ हजार ७५० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे अनुदान येत्या काही दिवसांत संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली..ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजीला बायोगॅस संयंत्र हा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आहे. बायोगॅसच्या वापरामुळे कुटुंबाच्या इंधन खर्चात बचत होण्याबरोबरच सेंद्रिय खत व्यवस्थापनालाही चालना मिळते. नवीन राष्ट्रीय बायोगॅस सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीत १९८२ पासून कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यासह देशात आघाडीवर असल्याचे जिल्हा परिषदेने म्हटले आहे..Gobardhan Scheme: गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.जिल्ह्यात आजअखेर एकूण १ लाख २४ हजार १४४ बायोगॅस संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ६७३ संयंत्रांना शौचालये जोडण्यात आली आहेत. केंद्र आणि राज्य शासनामार्फत बायोगॅस संयंत्र उभारणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति घनमीटरनुसार अनुदान दिले जाते..Biogas Scheme: आता 'सीएनजी', 'पीएनजी'मध्ये बायोगॅसचं मिश्रण? 'गोबरधन' योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?.या ६९० लाभार्थी शेतकऱ्यांचे केंद्र शासनाकडील अनुदान प्रलंबित होते. हे अनुदान मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर प्रलंबित अनुदानासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, आता ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा केली जाणार आहे..एका संयंत्रासाठी सुमारे ४० हजारांचा खर्चसध्या एका बायोगॅस संयंत्राच्या उभारणीसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. केंद्र शासनाकडून १४ हजार ३५० रुपये, तर जिल्हा परिषद सेस फंडातून पूरक अर्थसाहाय्य म्हणून प्रति संयंत्र ५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.२०२४-२५ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला ७३५ बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २०२५ अखेर त्यापैकी ६९० संयंत्रांचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे उद्दिष्टाच्या ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.