Banana Farming Updates: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून झालेल्या पावसासह वादळी वाऱ्याचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. काळम्मावाडी, वाकी, पुळाचीवाडी, राजापूर, राधानगरी परिसरातील अनेक केळी बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे..यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली असली, तरी जूनअखेर सुरू झालेल्या जोरदार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली. फळधारणेच्या अवस्थेतील तसेच काढणीसाठी तयार असलेल्या बागांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे..Banana Crop Damage: पावसाच्या तडाख्यात केळी पिकांचे मोठे नुकसान.केळी लागवडीसाठी मोठा खर्च केला जातो. खते, कीटकनाशके, सिंचन व मजुरीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही नैसर्गिक आपत्तीमुळे मेहनत वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी केळीचे घड जमिनीवर पडल्याने त्यांची विक्रीही अशक्य झाली आहे..Banana Crop Damage: पंधरा मिनिटांतच केळीबागा भुईसपाट.केळी उत्पादक दिनकर पाटील म्हणाले, ‘‘यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. आता वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे कोसळली आहेत. पुढील काही दिवसही पाऊस आणि वाऱ्याचा अंदाज असल्याने उर्वरित बागांनाही धोका निर्माण झाला आहे.’’.शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच केळी उत्पादकांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. कृषी विभागानेही बाधित भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.