Kolhapur News: शेतकऱ्यांना पीककर्ज व कर्जमाफीसह विविध कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रलंबित नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत..जिल्ह्यात पीएम किसान योजनेत नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते..AgriStack App Registration: सांगली जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’पासून दूर.शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ देताना शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्तरावर व्हीएलई, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी यांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांशी संपर्क साधावा व नोंदणी पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले..AgriStack App Registration: सांगली जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’पासून दूर.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘फार्मर आयडी’ काढलेला नाही, त्यांनी जवळच्या महाऑनलाइन सेवा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..गावातील पीएम किसान लाभार्थ्यांची जमीन मालकी नोंद तपासून आवश्यक ती माहिती अद्ययावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, ज्या गावांमध्ये व तालुक्यांमध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणी शंभर टक्के पूर्ण होईल, त्या गावांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार.असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. कृषी, महसूल, ग्रामविकास व सहकार विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबवून प्रलंबित नोंदी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.