Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. ७) मागील २४ तासांत सरासरी ५१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. .जिल्हा प्रशासनाच्या सकाळी दहा वाजेच्या अहवालानुसार, पावसामुळे जिल्ह्यातील २९९ पैकी ५७ बंधारे पाण्याखाली गेले असून ४ राज्यमार्ग, ७ प्रमुख जिल्हा मार्ग, १४ ग्रामीण मार्ग आणि ८ इतर जिल्हा मार्ग, असे एकूण ३३ रस्ते वाहतुकीस बाधित झाले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे..Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा पात्राबाहेर धरणक्षेत्रांत मुसळधार.राधानगरी धरणात ३.६३ टीएमसी (४७ टक्के) पाणीसाठा असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात ४५ टक्के, वारणा धरणात ३४ टक्के, तर दूधगंगा धरणात १७ टक्के पाणीसाठा असून दूधगंगा धरणातून १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे..Kolhapur Rain Update: कोल्हापुरातील ४८ बंधारे पाण्याखाली.पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधारा येथे ३५ फूट ४ इंच, शिरोळ येथे ४४ फूट आणि नृसिंहवाडी येथे ४१ फूट ६ इंच असून तिन्ही ठिकाणी पाणी इशारा पातळीखाली असल्याने सध्या पूरस्थितीचा तातडीचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पावसामुळे आजअखेर ४७ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आलेली नसून जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व पोलीस यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करत आहेत..तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)चंदगड (७०.३), राधानगरी (६९.७), आजरा (६६.१), भुदरगड (५८), पन्हाळा (५७.६), करवीर (४६), गडहिंग्लज (४४.६), शाहूवाडी (४४.२), कागल (३४.५), हातकणंगले (२४.९) आणि शिरोळ (१७.७) अशी नोंद झाली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.