Flood Update: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सोमवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ५२.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात तब्बल १०१.३ मिलिमीटर पाऊस पडत जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली. शाहूवाडीत ८७, राधानगरीत ६५.७, चंदगडमध्ये ६१.७, पन्हाळ्यात ५९.६, करवीरमध्ये ५४.८ आणि आजऱ्यात ५१.३ मिलिमीटर पाऊस झाला. .सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून २९९ पैकी ४८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात ४१ टक्के पाणीसाठा झाला असला तरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंदच ठेवण्यात आले आहेत. तुळशी धरणात ४१ टक्के, वारणा धरणात २८ टक्के आणि दूधगंगा धरणात १३ टक्के पाणीसाठा आहे. वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे..Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा पात्राबाहेर धरणक्षेत्रांत मुसळधार.पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्यावर सकाळी अकरा वाजता ३३ फूट ३ इंच, शिरोळ येथे ४० फूट ३ इंच आणि नृसिंहवाडी येथे ३६ फूट इतकी नोंदली गेली. तिन्ही ठिकाणी पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी असल्याने सध्या पूरस्थितीचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे..Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस.दरम्यान, रेल्वे वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र अतिवृष्टीमुळे ३ राज्य मार्ग, ५ प्रमुख जिल्हा मार्ग, ८ ग्रामीण मार्ग आणि २ इतर जिल्हा मार्ग असे एकूण १८ रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. पावसामुळे पडझड व अन्य घटनांतून जिल्ह्यात १३ लाख ८७ हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाले असून त्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ४ लाख २५ हजार रुपयांच्या नुकसानीची नोंद झाली आहे. .जिल्ह्यात अद्याप कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आलेली नसून जिल्हा प्रशासन, महसूल, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.