Kolhapur News: स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा पिवळे कार्ड मिळाले आहे. ही बाब गंभीर असल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई का करू नये, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस दिली..कार्तिकेयन यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून शुद्ध व गुणवत्तापूर्ण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे प्राथमिक काम आहे. यासाठी दरवर्षी दोनवेळा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागामार्फत पिण्याच्या पाण्याच्या स्रोत परिसराचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते..Water Contamination : साताऱ्यातील आठ गावांत पिण्याचे पाणी दूषित.एप्रिल २०२५ मध्ये पावसाळ्यापूर्वी घेतलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात अनेक त्रुटी आढळल्याने काही ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले होते. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या मॉन्सूनोत्तर स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना पुन्हा पिवळे कार्ड मिळाले आहे. .Yellow Tomatoes: काही टोमॅटो पिवळे का होतात?.दुसऱ्यांदा पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीभुदरगड तालुका : नाधवडे, गारगोटी, हणबरवाडी, मिणचे बुद्रुक व हेदवडे. चंदगड तालुका : दाटे, गुडेवाडी व बुजवडे. गगनबावडा तालुका : मुटकेश्वर. हातकणंगले तालुका : रुकडी, यळगूड, शिरोली पुलाची, टोप, भेंडवडे. करवीर तालुका : निगवे खालसा, कुर्डू, वडकशिवाले, चुये व नांदगाव..पन्हाळा तालुका : कोलिक. राधानगरी तालुका : धामोड, बुरंबाळ, राशिवडे बुद्रुक, शेळेवाडी व टिटवे. शिरोळ तालुका : अब्दुल लाट, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी, उदगाव, कवठे गुलंद, गौरवाड, टाकळी, घोसरवाड व जुने दानवाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.