kolhapur News: रामलिंग पठारावर वारणा नदीतून पाणी उपसा करण्यास विरोध दर्शवणारा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.ग्रामपंचायतीची थकबाकी सवलत देण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावली होती. अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी पाटील होत्या. .या वेळी उपसरपंच पूनम गुरव, सदस्य जगदीश पाटील, सुहास गुरव, अभिजित चव्हाण, कमल ढाले, प्रमोद सूर्यवंशी तसेच ग्रामअधिकारी वासंती कुलकर्णी, दत्तात्रय देवकाते उपस्थित होते..Ichalkaranji Water Scheme : कोल्हापूरातील कागल तालुका आणि इचलकरंजी वाद पेटणार? पाणी योजनेस सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.या वेळी ग्रामपंचायतीची थकबाकी वसुलीसाठी ग्रामस्थांनी ३१ डिसेंबरच्या आत आपली थकबाकी भरली तर एकूण थकबाकीच्या ५० टक्के सवलत मिळणार असल्याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामसभेच्या मागणीनुसार ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. थकबाकी वसुलीला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे..वारणा नदीतून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून हातकणंगलेतील वीस हून अधिक गावांना या नदीतून पाणीउपसा केला जाणार आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या शेत जमिनींना पुरेसा पाणीपुरवठा होणार नाही, त्यामुळे या योजनेला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. त्या अनुषंगाने ग्रामसभेत वारणा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी हात उंचावून तीव्र विरोध दर्शविणारा ठराव करण्यात आला आहे. या ग्रामसभेत अजय पाटील, रणजित पाटील, पतंगराव वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते..Water Issue : ‘खांड’चे पाणी वळविण्यास विरोध.वारणा नदीचे पाणी मिळण्यासाठी तसेच धरणग्रस्त बांधवांसाठी परिसरातील ग्रामस्थांनी शेती गायरान व गावठाणचा त्याग केला आहे. या लाभ क्षेत्रातील रहिवासी व शेतकऱ्यांना अजूनही पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी वारणा नदीचे पाणी मिळाले नाही. .त्यामुळे धरणग्रस्त लोकांना प्राधान्याने पाणी मिळणे अपेक्षित असताना वारणा काठच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर योजना अमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे. याला ग्रामस्थांनी विरोध करणे अनिवार्य आहे.- अजय पाटील, माजी उपसभापती, पंचायत समिती हातकणंगले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.