Bihar Farmers To Get ₹9000 Annually: बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने २०२६ च्या अर्थसंकल्पातून 'जननायक कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी योजने'ची घोषणा केली. याअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ३ हजार रुपये अतिरिक्त मिळतील. यामुळे केंद्राकडून मिळत असलेले ६ हजार रुपये मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण वर्षाला ९ हजार रुपये जमा होतील. .विधानसभा निवडणुकीपूर्वी जेडीयू-भाजप यांच्या युतीने याबाबत आश्वासन दिले होते. त्याची आता अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आली आहे. यामुळे बिहारमधील ७३ लाख शेतकऱ्यांना आता वार्षिक ६ हजार रुपयांऐवजी ९ हजार रुपये मिळतील. राज्याचे अर्थमंत्री बिजेंद्र प्रसाद यादव यांनी मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) बिहार राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यातून त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर जननायक कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी सुरू करण्याची घोषणा केली. .या योजनेअंतर्गत, पीएम किसान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी ३ हजार रुपये अतिरिक्त मिळतील. पीएम किसान योजनेअंतर्गत ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम २ हजार रुपयांच्या तीन सन्मान हप्त्यात दिली जाते. आता येथील शेतकऱ्यांना प्रत्येक २ हजार रुपयांच्या हप्त्यासोबत १ हजार रुपयांचा वेगळा हप्ता मिळेल.वाढता उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करणे आणि ग्रामीण उत्पन्न व्यवस्था मजबूत करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. .PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो.बिहार विधानसभा निवडणूक २०२५ नंतर सादर करण्यात आलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पातून सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी एक व्यापक रोडमॅप मांडला. ज्यात शेती, पशुपालन, सहकार आणि सिंचन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बिहारमधील सुमारे ७६ टक्के लोक शेती आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रात काम करून रोजगार मिळवतात. .PM Kisan Yojana: तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं आहे का? 'असे' तपासा.कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्रता निकष काय?कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी असलेल्या निकषांसारखेच असणार आहेत. जे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेसाठी पात्र आहेत; त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.