Kisan Sabha Protest: कांद्याला तीन हजार रुपये भावासाठी किसान सभेचे आंदोलन
Onion Price Demand: कांद्याला किमान ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १,५०० रुपये अनुदान द्यावे आणि हा निर्णय राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. २९) आंदोलन करण्यात आले.